पंतप्रधान नरेंद्र मोदी करिष्मा असलेले नेते: अजित पवार AJIT PAWAR

0

 

(Jalgaon)जळगाव – (Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करिष्मा असलेले नेते आहेत, या शब्दात (NCP senior leader Ajit Pawar)राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोदी यांचे कौतुक केले आहे. जळगावातील एका राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोंड भरून स्तुती केली.

“नरेंद्र मोदी हे देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्यासारखे करिष्माई नेते आहेत. मोदी व अमित शहा या नेत्यांमुळेच आज देशातील बहुतांश राज्यांत भाजपचे सरकार आहे.
पवारांनी यावेळी नरेंद्र मोदी व (Atal Bihari Vajpayee)अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळाचीही तुलना केली. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते, मात्र मोदींच्या कार्यामुळे आणि जादूमुळे भाजपने केंद्रात दोनदा स्वबळावर सरकार स्थापन केले. बहुतांश राज्यांतही त्यांचेच सरकार आहे..”, असेही ते म्हणाले.
दोन खासदार असणाऱ्या भाजपला मोदींमुळेच 2014 व 2019 मध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यात यश आले, असे वक्तव्य अजित पवारांनी गत एप्रिल महिन्यातही केले होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कौतुक करताना अजित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर मात्र निशाणा सातला. सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचेही दर ठरले आहेत, असा आरोप त्यांनी केला
एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. येथे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचेही दर ठरलेले आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या घरांवर भ्रष्टाचाराप्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे, असे पवार म्हणाले.