Home Top News AMRAWATI चांदूर रेल्वेत काळे झेंडे दाखवून निषेध

AMRAWATI चांदूर रेल्वेत काळे झेंडे दाखवून निषेध

0

 

अमरावती AMRAWATI : प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीव्दारे देशात अमृत भारत स्टेशन योजनेचा भुमिपुजन कार्यक्रम सुरू आहे. तर दुसरीकडे अमृत भारत स्टेशन योजनेत अमरावती जिल्ह्यातील चांदूरच्या रेल्वे स्टेशनचा समावेश न केल्याबद्दल रोष व्यक्त करण्यासाठी स्थानिक रेल रोको कृती समितीकडून रेल्वे स्टेशनवर केंद्र सरकार आणि खासदार रामदास तडस यांचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी डिटेन करून सोडून दिले. यावेळी ग्रामिण पोलीस व रेल्वे पोलीसांचा तगडा बंदोबस्त होता. यात सर्व पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाल्याची माहिती नितीन गवळी, अध्यक्ष रेल रोको कृती समिती यांनी दिली.