नागपूर (NAGPUR) : काँग्रेस नेते (RAGUL GANDHI) राहुल गांधी मागासलेल्या समाजाचा अपमान करतात परंतु माफी मागण्यास तयार नाही असे प्रतिपादन केंद्रीय माहिती,प्रसारण व क्रीडा मंत्री (ANURAG THAKUR) अनुराग ठाकुर यांनी नागपुरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता माध्यमाशी बोलताना केले. ठाकूर म्हणाले, राहुल गांधी उद्या सुरतच्या कोर्टात हजर होणार आहेत. या विषयी बोलताना ते वारंवार मागासलेल्या समाजाचा अनादर करून माफी मागत नाही, राहुल गांधींची काय मजबुरी आहे, त्यामुळे राहुल गांधींवर देशात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.गेल्या तीन वर्षांपासून हा खटला सुरू होता. खरेतर त्यांनी माफी मागितली असती,पण ज्या दिवशी निकाल आला त्याच दिवशी राहुल गांधी म्हणाले की, मी गांधी आहे मी माफी मागणार नाही.राहुल गांधींनी कधीच (swatantra veer savarkar) सावरकरांची माफी मागितली नाही.आदर केला नाही.राहुल गांधींनी नेहमीच देशाच्या लोकशाहीच्या विरोधात परदेशी लोकांचा पाठिंबा मागितला असा आरोपही ठाकूर यांनी केला.
राहुल गांधी करताहेत मागासलेल्या समाजाचा अपमान- अनुराग ठाकूर
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा