नागपूर (NAGPUR) : स्वातंत्र्यवीर सावरकर अनेक वीरांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या विचाराच्या मार्गावर अनेकांनी प्राणाची आहुती दिली. (RAHUL GANDHI) राहुल गांधी म्हणतात मी स्वातंत्र्य वीर सावरकर नाही, खरे आहे, तुम्ही होऊ सुद्धा शकत नाही, कारण अंदमान निकोबारच्या काल कोठडीत एक तास काढू शकणार नाही. ज्यांना इतिहास माहित नसेल अशा लोकांना जनतेनेच धडा शिकवण्याची गरज आहे असे प्रतिपादन सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना केले. (sudhir mungantiwar) मुनगंटीवार म्हणाले, खा.शरद पवार (SHRAD PAWAR) म्हणतात सावरकर राष्ट्राचा विषय होऊ शकत नाही. मात्र,तो आमचा आस्थेचा विषय आहे. सन्मानाचा विषय आहे. यात राज्य किंवा राष्ट्रीय विषयाचा प्रश्न उपस्थित होत नाही, जो देशभक्त असेल त्याच्यासाठी हा कायम विषय आहे.
दरम्यान, गुजरात मधील अहमदनगर सावरकर नगर करा? या सुषमा अंधारे यांच्या विधानाचा समाचार घेताना
तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्या जनतेच्या पैशाने मिळणाऱ्या पैशातून एक पेन विकत घ्या आणि हे नाव बदललं पाहिज यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी , सोनिया गांधी यांचं पत्र घ्या आणि नाव बदलण्यासाठी अर्ज करा असा सल्ला दिला. दरम्यान, धीरेंद्रकृष्ण महाराज यांच्याबद्दल छेडले असता
हेट स्पीच करण्याचा कोणालाच अधिकार नाही, तो कोणत्याही समाजाचा जातीचा पंथाचा धर्माचा रंगाचा उंचीचा असो कायद्याच्या चौकटीत, त्या हेट स्पीचचा अभ्यास केला पाहिजे, त्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, तो कोणत्या पक्षाचा आहे हे कधीच महत्त्वाचं नाही असेही मुनगंटीवार म्हणाले.