पुणे : यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाने उच्चांक गाठला असताना राज्यात काही भागात उद्या शनिवारपासून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. ४ ते ६ मार्च या दरम्यान राज्यात विविध भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तविला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि विदर्भात सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यापूर्वीच उष्णतेच्या लाटेचेही अंदाज वर्तविले आहेत
राज्याच्या काही भागात उद्यापासून पावसाचा अंदाज
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा