राखी चव्हाण ‘वूमेन जर्नालिस्ट ऑफ द इयर’ जागतिक महिला दिनी प्रदान होणार पुरस्कार

0

नागपूर. जागतिक महिला दिनानिमित्त (On the occasion of International Women’s Day ) नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब ऑफ नागपूरच्या (Nagpur Shramik Patrakar Sangh, Tilak Patrakar Bhavan Trust and Press Club of Nagpur) संयुक्त विद्यमाने 8 मार्चला महिला पत्रकारांना सन्मानित केले जाते (Women journalists are honored). ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद यांच्या दिवंगत पत्नी शोभा विनोद यांच्या स्मरणार्थ वूमेन जर्नालिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा पुरस्कार लोकसत्ताच्या पत्रकार राखी चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी 4.30 वाजता प्रेस क्लब येथे समारंभपूर्वक या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. विभागीय आयुक्त डॉ विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात नागपुरातील महिला पत्रकारांचा डॉ. ममता खांडेकर, (सत्ताधीश), मेहा शर्मा (लोकमत टाईम्स), पल्लवी बोरकर (हितवाद), प्रीती अतुलकर (टाईम्स ऑफ इंडिया ) व डॉ. सोनाली पियूष काकडे-पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या समाजव्रतीला जीवन गौरव पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येतं. यदा ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सीमा साखरे यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.