युवासेना/शिवसेना व उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही. जे. शिंदे महाविद्यालय वरूडा रोड धाराशिव येथे झाला. धाराशिव संभाजीनगर, पुणे, अहमदनगर या शहरातील २५ हून अधिक कंपनीचा समावेश असून जवळपास २५०० हून अधिक जागांसाठी रोजगार मेळावा पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खाजदार ओम राजे निंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांची उपस्तिती होती. आज या रोजगार मेळाव्यासाठी उमेदवारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विविध कंपन्यांनी जागेवरच निवड करून ऑफर लेटर उमेदवाराना देण्यात आले आहे. तरी या रोजगार मेळाव्यासाठी युवासेना / शिवसेना सहसचिव मनीषा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडला.