नागपूर विभागातील ४१ नायब तहसीलदारांना सुधारित वेतनश्रेणी

0

नागपूर – नागपूर विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील कार्यरत, निवृत्त अशा ४१ पात्र अधिकाऱ्यांना तहसीलदार संवर्गातील वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे.
नागपूर विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील कार्यरत आणि निवृत्त अधिकाऱ्यांना तहसीलदार संवर्गातील वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नायब तहसीलदार संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अशा एकूण ४१ पात्र अधिकाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. नागपूर विभागाच्या महसूल उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी ही माहिती दिली.