Home Top News विदर्भातील 11 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता मंजूर

विदर्भातील 11 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता मंजूर

0

मुंबई, 20 जून   उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72रू कोटींच्या 11 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यात आल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा द मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

बैठकीत एकूण 73 विषय मंजूर करण्यात आले. तसेच रु. 240.02 कोटीचे १२ दायित्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी रु. 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांचे मुल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचे मोबदला तसेच पुनर्वसन बाधीत कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८.४८ कोटी मंजूर करण्यात आले. असे एकुण 5273.69 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.