नागपूर: महाराष्ट्र राज्य चे माहिती व जनसंपर्क खात्याचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक श्री.श्रीपाद गजानन राव सहस्त्रभोजने यांचे वयाचे ९८व्या वर्षी आज संध्याकाळी दुःखद निधन झाले.१९४३ते१९५० या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आंध्र प्रदेश बंगाल व आसाम प्रांत येथे प्रचारक होते
प्रचारक म्हणून थांबल्यावर ते राष्ट्रधर्म, हिंदुस्थान समाचार, तरुण भारत व हितवाद येथे पत्रकारिता करीत होते.त्यानंतर ते सरकारी नोकरीत गेले.मुंब इला बदली झाल्यानंतर ते अल्पबचत खाते, म.रा वि.म.यात प्रसिद्धी अधिकारी होते.
महाराष्ट्र राज्य चे ४मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण,बॅ.ए.आर.अंतुलेव बाबासाहेब भोसले यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी त्यांच्यावर होती.चार मुख्य मंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम केलेले ते एकमेव अधिकारी होते.
निवृत्त झाल्यावर त्यांना सरकार ने मुदतवाढ दिली होती पण ती नाकारून ते डॉ.दाजीसाहेब पटवर्धन यांच्या तपोवन येथे सेवा देऊ लागले.
निवृत्तीनंतर पेन्शन धारकांची जी संघटना आहे त्यांचे कार्यत त्यांनी सक्रिय सहभाग दिला होता त्यानंतर सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांच्या सांगण्यावरून ते नागपूर आले नागपूरच्या सामाजिक जीवनात विविध जबाबदाऱ्या स्वीकारल्या , देहदान, रक्तदान यासाठी त्यांनी प्रचार कार्य केले. काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आज सायंकाळी पाच वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले
त्यांच्या मागे पत्नी वसुधा मुलगा हर्षल माधवी मुलगी मंगला नाईक व बराच मोठा आप्तपरिवार आहे
आज अकरा वाजता अंत्यसंस्कार
श्री ग सहस्रभोजने यांच्या अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता दीनदयाळ नगर येथील गणेश मंदिर जवळ या निवासस्थान येथून निघणार आहे.पार्थिवावर उद्या 14 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता अंबाजरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.