कर्मचारी संपावर यंत्रणा कोलमडली जुन्या पेंशनने वाढविले टेंशन, शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

0
Protest People

नागपूर : जुन्या पेंशन योजनेच्या (old pension scheme ) मागणीसाठी राज्य सरकारच्या अधिनस्थ असणारे शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्यसंस्था, सार्वजनिक आरोग्य सेवा, शिक्षक अशा जवळपास सर्वच संवर्गातील राज्यभरातील कर्मचारी बेमुदत संपावर (Employees across the state are on indefinite strike ) गेले आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणा पुरती कोलमडल्याचे (government system has completely collapsed ) दिसून येत आहे. विदर्भात सर्वदूर अशीच स्थिती आहे. शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे. त्यामुळे कामासाठी आलेल्यांना आल्या पावली परतावे लागत आहे. आरोग्य व्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. परीक्षा काळात सुरू झालेल्या या बेमुदत संपात शिक्षकही सहभागी झाले आहेत. मात्र १० वी १२ वाज्या परीक्षा घेण्याची जबाबदारी असणाऱ्यांनी संपापासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी आणि पालकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, संप अवैध ठरवित संपकऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्याता आला आहे. त्याचा कोणताही परिणाम संपकऱ्यांवर झालेला दिसत नाही. प्रत्येक जिल्हास्तरावर संपकरी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत धरणे, सभांचे आयोजन केले आहे.
रुग्णांचे हाल, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
नागपुरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यासह इतर कर्मचाऱ्यांनी उडी घेतली. त्यामुळे येथील नियोजित बहुतांश शस्त्रक्रिया स्थगित कराव्या लागल्या. अत्यावश्यक शास्त्रक्रियाच तेवढ्या होत आहे. रुग्णांना दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा रुग्णांचा आरोप आहे. प्रशासनाकडून परिचारिका महाविद्यालयांतील विद्यार्थी, निवासी व आंतरवासिता डॉक्टरांसह इतरही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध वर्डांमध्ये सेवा लावल्या आहेत.
धमक्यांमुळे शिक्षक संघटना आक्रमक
माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीही संपात सामील होत आहेत. मात्र संपात जाण्याऱ्या शिक्षकांना प्राचार्यांकडून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जात आहे. सकाळच्या पाळीतील काही शिक्षकांनी मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना जुन्या पेन्शनच्या मागणीचे निवेदन दिले. तसेच संपावर जात असल्याचा इशारा दिला. यावर मुख्याध्यापकांडून अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी अनेक शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहेत.

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा