मुंबई : एंशीच्या दशकात दूरदर्शनच्या अत्यंत लोकप्रिय अशा नुक्कड (1986) या मालिकेत ‘खोपडी’ या मद्यपीची अतिशय प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणारे प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते समीर खक्कर यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. समीर खक्कर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. त्यांना काल दुपारी श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात (Sameer Khakhar demise ) आले होते. आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. समीर खक्कर हे मुंबईच्या बोरिवलीच्या आयसी कॉलनीमध्ये एकटेच राहत होते. समीर खक्कर यांची पत्नी अमेरिकेत राहते. अॅमेझॉन प्राइमच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फर्जी’ या मालिकेत ते अखेरचे दिसले होते.
समीर खक्कर यांनी त्यांच्या 38 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत विविध टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. काही काळ त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रातून ब्रेक घेत अमेरिका गाठले व ते काही काळ तेथेच स्थायिक झाले. भारतात परतल्यावर त्यांनी पुन्हा अभिनयास सुरुवात केली. दोन गुजराती नाटके देखील केली आणि सलमान खानच्या जय हो मधील भूमिकेमुळे ते पुन्हा प्रसिद्ध झाले. समीर यांनी मनोरंजन, सर्कस (शाहरुख खानसोबत) सारख्या मालिकांमध्येही काम केले. समीर यांनी ‘परिंदा’, ‘ईना मीना डीका’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’, ‘आतंक ही आतंक’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’, ‘अव्वल नंबर’, ‘प्यार दीवाना होता है’, ‘हम हैं कमाल के’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या