पहाटेच्या शपथविधीची संजय राऊतांनाही कल्पना होती-शिंदे गटाचा दावा

0

मुंबई :२०१९ च्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांप्रमाणे खासदार संजय राऊतांना देखील होती, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते आमदार (Sanjay Raut was aware of Oath Ceremony ) संजय शिरसाट यांनी केले आहे. या शपथविधीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना देखील होती, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊत यांना देखील माहिती होती. संजय राऊत पडद्यामागून काम करत होते. त्यांना हे प्रकरण माहित होते.

त्यामुळे पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यामागे संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे, असा दावाही शिरसाट यांनी केला. आमदार शिरसाट म्हणाले की, संजय राऊत सायको आहेत. ते कधी काय बोलतील आणि कोणाला अडचणीत आणतील, हे सांगताच येत नाही. उद्धव ठाकरे यांची जी अडचण वाढली आहे, ती फक्त या सायको भूमिकेने झाली आहे. संजय राऊत बडबड करतात आणि ते निस्तारण्याचे काम उद्धव ठाकरे यांना करावे लागत होते. हे सर्व उद्धव ठाकरे यांना देखील माहित आहे.

पवार काय म्हणाले
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता शपथविधीवर अधिक बोलण्याचे टाळले. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनाच विचारायची गरज आहे की, इतक्या दिवसांनी त्यांनी हे प्रकरण का काढलं? फडणवीस यांच्या वक्तव्याला उत्तर देऊन मी त्यांचे महत्त्व वाढवणार नाही. सत्तासंघर्षाच्या सुनावणीत सध्या ‘इंटरेस्टिंग’ घडते आहे. आत्ता काय होईल हे सांगणे अवघड आहे, असेही शरद पवार त्यावर भाष्य करताना म्हणाले आहेत.

 

 

 

 

 

 

पालक पत्ता चाट आणि चायनिज भेल EP.NO 86|How to make crispy palak chaat Recipe|Chinese Bhel Recipe|

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा