उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढूपणा करतेय-फडणवीस

0

नागपूरः सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर वेळकाढूपणाचा (DCM Devendra Fadnavis on SC hearing) आरोप केला. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढूपणा करण्यासाठी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी करत आहे. वर्षभर निकालच लागू नये हे त्यांचे वेळकाढूपणाचे धोरण होते. त्याच धर्तीवर हा निकाल आला आहे. आता यावर नियमित सुनावणी होऊन अंतिम निर्णय लागेल. राबिया प्रकरणावरील निर्णयावर पुनर्विचार व्हावा, म्हणून ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे प्रकरण पाठविण्याची मागणी संयुक्तिक नाही. आम्ही गुणवत्तेवर हे प्रकरण ऐकू. त्यानंतर अंतिम निर्णय द्यायचा की ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवायचे ते आम्ही ठरवू, असेही न्यायालयाने नमूद केल्याचे फडणवीस म्हणाले.

संजय राऊतांच्या आरोपावर
आपल्याला कारागृहात ठार मारण्याचा कट हरोता, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत काहीही आरोप करू शकतात. ते दिवसातून तीनवेळा आरोप करतात. सकाळी कोणता आरोप केला, हे त्यांच्या संध्याकाळी लक्षात राहत नाही. त्यामुळे त्यावर मी काय उत्तर देणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

 

 

 

 

 

पालक पत्ता चाट आणि चायनिज भेल EP.NO 86|How to make crispy palak chaat Recipe|Chinese Bhel Recipe|