संसदीय नेतेपदावरून संजय राऊत यांची उचलबांगडी

0

मुंबई : शिवसेनेत संसदीय नेतेपदावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली (MP Sanjay Raut) आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदावर खासदार गजानन किर्तीकर यांची (MP Gajanan Kirtikar) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे. सध्या शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह येताच शिंदे यांनी पहिलाच मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खासदार किर्तीकर यांना व्हीप काढणे शक्य होणार आहे. व्हीपचे पालन न करणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. लोकसभेत 18 खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटाकडे तर केवल ५ खासदार ठाकरेंकडे शिल्लक आहेत. राज्यसभेतील तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या निकालानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने हालचाली गतिमान केल्या आहेत. शिंदे गटाकडून संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आल्यावर आता आणखी काय घडामोडी होतात, याकडे लक्ष लागले आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी जरी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत.
दरम्यान, गटनेते पदावरून हकालपट्टी झालेले खासदार संजय राऊत यांच्याकडून अद्याप या निर्णयावर कुठलीही प्रतिक्रिया आलेले नाही.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा