-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील उर्दू विभागाच्या वतीने सहअभ्यासक्रम गतीविधी अंतर्गत विशेष व्याख्यान तसेच मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विद्यापीठातील उर्दू विभाग हॉल येथे ‘उर्दू साहित्याची नवीन दिशा’ या विषयावर शनिवार दिनांक, २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या कार्यक्रमाला सहअधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून उर्दू इतिहासकार व कवी डॉ. शर्फुद्दीन साहिल उपस्थित राहणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता महफिल- ए- मुशायरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला डॉ. शर्फुद्दीन साहिल, डॉ. समीर कबीर, रेहान नासीर, अजहर हुसेन, बाबर शरीफ, नईम अन्सारी, मधु गुप्ता सहभागी होणार आहे. मुशायरा कार्यक्रमाचे संचालन सोहेल अन्सारी हे करणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख तथा समन्वयक डॉ. संतोष गिऱ्हे व संयोजक डॉ. समीर कबीर यांनी केले आहे.