बारसू प्रकल्पावरून ठाकरे पवारांमध्ये ‘गंभीर’ मतभेद!

0

मुंबई :(mumbai) रत्नागिरीतल्या बारसू रिफायनगरी प्रकल्पावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा असून त्यामुळे महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शरद पवारांनी बारसू प्रकल्प उभारण्यासाठी लोकांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले तर ठाकरे गटाने या प्रकल्पालाच तीव्र विरोध केला (Sharad Pawar and Uddhav Thackeray) आहे. उद्योगमंत्री (udya samant)उदय सामंत यांनी तीन दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांनी या प्रकल्पावर आपली भूमिका मांडली होती. बारसू येथील रिफायनरी प्रकल्प घाईत करू नका व प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांनी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊनच पुढे जावे, असा सल्ला त्यांनी दिला होता. तर शरद पवारांच्या भूमिकेच्या उलट भूमिका आज ठाकरे गटाने घेतली. चर्चा करायची म्हणजे काय करायचे, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

जनतेचा सरकारवर विश्वास नाही, असे राऊत म्हणाले.बारसू प्रकल्पावरून(.Barsu Project)पवारांनी लोकांना विश्वासात घ्या, असा सल्ला देत मवाळ भूमिका घेतलेली असतानाच तर उद्धव ठाकरे यांनी बारसूमध्ये प्रकल्प करायला तीव्र शब्दांत विरोध दर्शवला. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चर्चा करायची म्हणजे नेमके काय, असा सवाल केला. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात फूट पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. बारसूच्या आसपास ज्या ज्या परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्या हट्टासाठी प्रकल्प याठिकाणीच करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असा(sanjay raut)संजय राऊतांचा दावा आहे.

 

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117