
अभिनेत्री प्रिया मराठे, शेफ विष्णू मनोहर आणि सपना मुनगंटीवार यांची उपस्थिती (Actress Priya Marathe, Chef Vishnu Manohar and Sapna Mungantiwar)
_______________________________________________________________________________________
नागपूर : महाराष्ट्र टेलीकम्युनिकेशन्स (Maharashtra Telecommunications) द्वारे संचालित शंखनाद न्यूज चॅनल (Shanknad News Channel) आणि पोर्टलच्या (portal) वतीने आयोजित विदर्भस्तरीय पाककला स्पर्धा येत्या २५ व २६ फेब्रुवारी रोजी नागपुरात होऊ घातली आहे.
कोराडी मार्गावरील बोखारा परिसरातील तुली काॅलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (Tuli College of Hotel Management) मध्ये होणारी ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी स्पर्धकांनी त्यांना आवडणारा कुठलाही एक (Vegetarian) शाकाहारी पदार्थ घरून बनवून आणून तो स्पर्धेच्या ठिकाणी सजवून प्रेझेंट करायचा आहे. या फेरीतून 50 स्पर्धक अंतिम फेरी साठी निवडले जातील, ज्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार २६ फेब्रुवारी रोजी स्पर्धेत सावजी पद्धतीचा कुठलाही एक शाकाहारी पदार्थ आणि पोळी तयार करायची आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ५१, २१ आणि ११ हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जातील. अंतिम फेरीतील सर्वांनाच नंतर शंखनाद वाहिनीवरील खाद्ययात्रा मालिकेत आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे. अभिनेत्री प्रिया मराठे, शेफ विष्णू मनोहर आणि सपना मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ रविवारी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला असून, स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता होईल. ( corporater Pragati Patil, Director of Tuli College of Hotel Management Urvashi Yash Rai, Praveen Rathi, Aarti Tai Waghmare, Manoj Yadav, Sanjeev Putharan, Niraj Jain) नगरसेविका प्रगतीताई पाटील, तुली काॅलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या संचालिका उर्वशी यशराॅय, प्रवीण राठी, आरती ताई वाघमारे, मनोज यादव, संजीव पुथरन, निरज जैन, शंखनाद खाद्ययात्रा मालिका आणि या स्पर्धेच्या समन्वयक, नागपूरच्या सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर (Chef Neeta Anjankar) आणि शंखनादचे संपादक सुनील कुहीकर (Sunil Kuhikar, editor of Shanknaad) यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन शंखनाद न्यूज चॅनलचे व्यवसाय व्यवस्थापक विनोद अंभोरे, मुख्य वार्ताहर सनी भोंगाडे, प्रशासकीय अधिकारी मीनल चतुरपाळे, रमाकांत दाणी, राजेंद्र उट्टलवार, प्रवीण दुपारे , कुणाल मंचलवार, अनुष्का काळे, आशीष उके , प्रियंका ठाकरे, माला दोडके व सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.
*कोण बनणार विदर्भाचा नंबर 1 शेफ? | Shankhnaad Khadya Yatra Cooking Competiton | #nagpurnews *