नरेंद्र जिचकार यांचा दावा ः आंबेडकरी जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप

0

नरेंद्र जिचकार यांचा दावा ः आंबेडकरी जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप
नागपूर. आंबाझरी उद्यान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बंद आणि जिर्ण अवस्थेत अनेक वर्षे पडीत होते. वादळामुळे या इमारतीची वाताहत झाली. आम्ही ते पाडले नाही. केवळ संभाव्य धोका लक्षात घेऊन धोकादायक भाग हटविला गेला, असा दावा मे. गरुड अॅम्युझमेंट पार्क प्रा. लि.चे नरेंद्र जिचकार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. डॉ. आंबेडकर स्मारक पाडल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आंबेडकरी जनतेकडून याठिकाणी आंदोलन केले जात आहे. आज प्रथकमच जिचकार यांनी समोर येत कंपनीवर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
उद्यान परिसरातील वास्तू 25 वर्षांपासून मोडकळीस आली होती. एकही कार्यक्रम होत नव्हता, असामाजिक तत्वांकडून सर्वप्रकारच्या अवैध प्रकारासाठी त्याचा उपयोग केला जात होता. वादळात याभागातील अनेकवर्षे जुनी मोठी वृक्षे मुळासकट उन्मळून पडली होती. त्यामुळे वास्तुच्याही मोठ्या भागाची पडझड झाली होती. त्यावेळी शासकीय यंत्रणेकडून त्याची दखलही घेतली गेली आहे. मुळात इथे आंबेडकर स्मारक असल्याची कुठेच नोंद नाही. निव्वळ खोटे आरोप करून राजकारण केले जात आहे. आरोप करणारे किशोर गजभिये यांची स्वतः भेट घेऊन कागदपत्रे मागितली. पण, ते कागदपत्रे दाखवू शकले नाहीत. त्यांनी आताही कागदपत्रे सादर करावी, असे आव्हान जिचकार यांनी गजभियेंना दिले.

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच प्रकल्प हाती घेतला
या प्रकल्पावर मोठा खर्च होणार आहे. मात्र, परताव्याची कुठलीही हमी नाही. पण, या शहराने बरेच काही दिले. त्याची परतफेड आणि सामाजिक बांधिलकितून हा प्रकल्प हाती घेतला आहे. एमटीडीसीकडून 30 वर्षांच्या लीजवर जागा घेतली आहे. मात्र, वेगळाच उपप्रचार केला जात आहे. इमारत पाडण्याच्या आरोपांची विभागीय आयु्क्तांमार्फत चौकशी केली जात आहे. त्यातून सारेकाही स्पष्ट होणार आहे.

आंबेडकरांवरील प्रेम प्रतिबिंबित होईल
करारानुसार 42.5 एकर जागेवर हा प्रकल्प साकारणार आहे. प्रकल्पाशी संबंधित सर्वच पैलुंची भव्यता नागपूरकरांना अनुभवता येईल. दावा केला जातो त्या स्मारकापेक्षाही भव्यदिव्य आणि आर्किटेक्टचा उत्तम नमुना असलेले थीम पार्क सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे साकारणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील खरे प्रेम नरेंद्र जिचकारला आहे, हे त्यातून प्रतिबिंबित होईल. विरोध करणाऱ्यांना आंबेडकरांविषयी खरच अस्था असेल तर आंबाझरीत साकारत असलेल्या थीम पार्कपेक्षा मोठे स्मारक उभारून दाखवावे असेही आव्हान त्यांनी दिले.

प्रकल्पातील महत्त्वाचे घटक
-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन
-शिवाजी महाराज थीम पार्क
-अॅम्पीथिएटर
-योगसाधना – ध्यान झोन
-सेलिब्रेशन झोन
– वैशिष्यपूर्ण प्रवेशव्दार
-फूड प्लाझा
-मनोरंजन पार्क
-मिनिएचर सिटी
-क्रीडा थीम पार्क
-जलक्रीडा सुविधा
-मत्स्यालय
-लेक व्ह्यू रेस्टॉरंट
-हस्तकला बाजार

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा