Home Vidarbha कीर्तिकुमार भांगडीया यांच्या उपस्थितीत शरदअलोणे यांचा भाजपात पक्षप्रवेश

कीर्तिकुमार भांगडीया यांच्या उपस्थितीत शरदअलोणे यांचा भाजपात पक्षप्रवेश

0

आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत गोसीखुर्द विश्रामगृह, ब्रम्हपुरी येथे भाजपा बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत महत्वपूर्ण संघटनात्मक बैठक संपन्न

ग्रा.पं. तोरगाव (खुर्द) येथील सरपंच शरदभाऊ अलोणे यांचा भाजपात पक्षप्रवेश

दि. २७ मे/ आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत गोसीखुर्द विश्रामगृह, ब्रम्हपुरी येथे भाजपा बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत महत्वपूर्ण संघटनात्मक विषयासंदर्भात भाजपा ची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी तालुक्यातील (एकूण ४१ बूथ) सर्व बूथ रचनेचा आढावा घेण्यात आला व उपस्थित भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना विविध संघटनात्मक विषयांवर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, चिमूर विधानसभा क्षेत्रांतर्गत ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांमध्ये (एकूण ४१ बूथ) विविध विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक जनतेच्या वतीने उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे हार्दिक स्वागत व शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. आमदार बंटीभाऊंनी भाजपा ज्येष्ठ नेते श्री. नागोरावजी पिल्लारे यांना शाल-श्रीफळ प्रदान करून त्यांचा सत्कार केला.

तसेच, या बैठकीदरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रा.पं. तोरगाव (खुर्द) येथील सरपंच श्री. शरदभाऊ अलोणे यांनी आमदार बंटीभाऊंच्या विकासकार्यावर व कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला. आमदार बंटीभाऊंनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या बैठकीला भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजयभाऊ गजपूरे, भाजपा जिल्हा महामंत्री क्रीष्णाभाऊ सहारे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिषभाऊ तुंम्पल्लीवार, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा नेते रवि मेश्राम, दीपक उराडे, उमाजी कुथे, नरेंद्र दुपारे, गजानन ढोरे तसेच, भाजपा नागभीडचे तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजयुमो चिमूर तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालु) पिसे, नागभीड कृ.उ.बा. समिती संचालक गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, भाजपा युवा नेते बालु सिद्धमशेट्टीवार व इतर सर्व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.