नागपूर – (NAGPUR) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार (SHARAD PAWAR)शरद पवार यांनी आज केंद्रीय महामार्ग मंत्री(NITIN GADKARI) नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एकीकडे राज्यात(BJP) भाजप विरोधात राष्ट्रवादीचे आरोप प्रत्यारोप सुरू असताना गडकरी-पवार यांच्या भेटीने अनेकांना धक्का दिला. विशेष म्हणजे गडकरी यांच्याकडे पवार यांनी स्नेहभोजनही घेतले. शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र , विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण संस्था लवकरच नागपूर जिल्ह्यातील(HINGNA) हिंगणा तालुक्यात सुरू होत आहे. आज या जागेची खा शरद पवार यांनी पाहणी केली. या संदर्भातील चर्चेसाठीच ही गडकरी-पवार यांची भेट होती असे कळते.
यावेळी माजी मंत्री(ANILDESHMUKH)अनिल देशमुख, माजी आमदार डॉ आशिष देशमुख उपस्थित होते. विमानतळावर ढोलताशांच्या गजरात पवार यांचे स्वागत दरम्यान नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आज नागपूर, अमरावती दौऱ्यासाठी आगमन झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पवार यांच्या स्वागतासाठी ढोलताशांच्या गजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पक्ष कार्यालयात पूर्वतयारी बैठक घेतल्यानंतर नागपुरातील कार्यकर्ता मेळावा ऐनवेळी रद्द झाला. अमरावतीला मेळावा होत आहे. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार डॉ आशिष देशमुख, दिलीप पनकुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आशिष देशमुख यांची हजेरी मात्र, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. स्वतः देशमुख यांनी शरद पवार यांचा विकासासाठी हा दौरा आहे यात राजकारण नको असे सांगितले.