मुंबईः (mumbai) बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या (matoshri)‘मातोश्री’ बंगल्यावर आले होते. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडायचे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी काल बुधवारी केला होता. शिंदे यांना कारागृहात जाण्याची भीती वाटत होती. त्यामुळे ते भाजपसोबत जाण्यास आग्रही होते, असा दावाही आदित्य यांनी केला होता. त्यांच्या या विधानावर आता आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “‘रडायचे’ हे शब्द त्यांनी आदित्य यांनी चुकीचे वापरले आहेत. कारण आम्ही सर्वच आमदार वारंवार उद्धव साहेबांना भेटायचो. आम्हाला या आघाडीत राहायचे नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी(congress) काँग्रेसवाले आम्हाला त्रास देतात, सहकार्य करत नाहीत. निधीबाबत सहकार्य करत नाहीत. ही आमची भूमिका आम्ही उद्धवजींकडे मांडली होती”, असे आमदार शिरसाट म्हणाले.
आमदार शिरसाट म्हणाले की, आम्ही सर्व आमदार (shinde)शिंदे यांच्याशी देखील बोललो होते. त्यानंतर निश्चितच एकनाथ शिंदे साहेब मातोश्रीवर गेले असतील. परंतु आपण आघाडीतून बाहेर पडावे, हे सांगण्यासाठी ते गेले होते. सर्व आमदारांची तशीच इच्छा होती. आम्ही सर्वांनीच एकनाथ शिंदेंना तसे सांगितले होते. त्यानंतर शिंदे साहेबांनी देखील तेच सांगितलं. बाकी रडले वगैरे बोलायची ही आदित्यची स्टाईल असावी, असेही शिरसाट म्हणाले.
ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110
https://youtu.be/honc0SfT4os?list=PLfo99UFoWEZLVJ7cGqjYq4v_wsukEAIo_