अटकेची तलवार लटकत असलेल्या मुश्रीफांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

0

मुंबईः घोटाळा प्रकरणी अटकेची टांगती तलवार लटकत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने (NCP Leader Hasan Mushrif) तात्पुरता दिलासा दिला असून अंमलबजावणी संचालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत.(hasan mushrif) हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने पूर्वीच फेटाळला होता. त्यामुळे आगामी दोन आठवडे तरी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी मुश्रीफ यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे. हसन मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळात बनावट कंपन्या तयार करून त्या माध्यमातून 158 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

 

यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईडीच्या पथकांनी हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी, कार्यालय तसेच नातेवाईकांच्या घरांवर (ed)ईडीने छापेमारी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्रीफ यांच्या कुटुंबाच्या खात्यात २०१३-१४ मध्ये रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या २००४ मध्ये बंद पडलेल्या कंपनीकडून 13 कोटी 85 लाख रुपये जमा झाले होते. माऊंट कॅपिटल(mount capital) प्रायव्हेट लिमिटेड या बंद कंपनीतून 24 कोटी 75 लाख रुपये वळते झाले होते. हा पैसा मुश्रीफ रिअल इस्टेटसाठी, साखर कारखाने विकत घेण्यासाठी वापरला, असाही आरोप आहे. याशिवाय आणखी काही बनावट कंपन्यांकडून त्यांच्या व कुटुंबीयांच्या खात्यात मोठाल्या रक्कमा जमा झाल्या असल्याच्या तक्रारी आहेत.

 

ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110