‘बीबीसी’विरुद्ध फेमा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

0

नवी दिल्लीः अंमलबजावणी संचालनालयाने बीबीसीवर घातलेल्या छाप्याची चर्चा बरीच रंगली होती. आता यासंदर्भात महत्वाच्या घडामोडी पुढे येत आहेत. परकीय निधीच्या अनियमितता प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बीबीसी इंडियाविरुद्ध फेमा कायद्यान्वये (Offence against BBC India) गुन्हे दाखल केले आहेत. ‘बीबीसी इंडिया’वर परदेशी फंडिंगमध्ये कथित उल्लंघन केल्याप्रकरणी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर आणि चौकशीनंतर ईडीने हे पाऊल उचलले आहे.

गुन्हे दाखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार(ED) ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदींनुसार बीबीसी इंडियाच्या काही अधिकार्‍यांचे दस्तऐवज आणि जबाब नोंदवण्याची मागणी केली आहे. कंपनीकडून थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) कथित उल्लंघनाचीही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.(BBC) बीबीसी समूहाच्या अनेक संस्थांनी दाखवलेले उत्पन्न व नफा हा देशातील त्यांच्या संचालनासाठी योग्य नव्हता आणि त्यांनी करही भरला नाही. येथे परदेशी संस्थांच्या वतीने कंपनीला पैसे देण्यात आले होते, याकडे लक्ष वेधण्यात आले.

राजकीय चर्चा

बीबीसी इंडियाच्या नवी दिल्ली व मुंबईतील (MUMBAI)कार्यालयांवर ईडी (ED)आणि आयकर विभागाने फेब्रुवारी महिन्यात छापे घालून झडत्या घेतल्या होत्या. राजकीय वर्तुळात या कारवाईची बरीच चर्चा झाली. विरोधी पक्षांनी ही कारवाई सुडबुद्धीची असल्याची टीकाही केली होती. या कारवाईचा संबंध मोदींवरील बीबीसीच्या माहितीपटाशी जोडला गेला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या कारवाईचे पडसाद उमटले होते.

 

 

ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110