आमदार नितीन देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा विनापरवानगी ‘संघर्ष यात्र’ भोवली

0

अकोला. – खारपाण पट्ट्यातील पाणी प्रश्नासह नागरिकांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Dekmukh ) यांनी विधान भवनात उपोषण (hunger strike in Vidhan Bhavan ) केले होते. त्यावेळी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण सोडले होते. पण, त्यांनंतरही प्रश्न कायम असल्याने आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा (Sangharsh Yatra from Akola to Nagpur) काढली. विनापरवानगी ही यात्रा काढल्याच्या कारणावरून देखमुखांसह त्यांच्या सुमारे १२५ कार्यकर्त्यांवर अकोल्यातील जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून संघर्ष यात्रेसाठी गर्दी जमवल्याचा आरोप त्यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, दिलीप बोचे, योगेश गीते यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आमदार नितीन देशमुख यांनी १० एप्रिलपासून श्री राजराजेश्वर मंदिरासमोरून ही यात्रा काढली आहे. आज ही यात्रा अमरावती जिल्ह्यात दाखल झाली आहे. अकोला जिल्ह्यातील ६९ गावे पाणीपुरवठा योजनांवरील स्थगिती उठवण्याच्या प्रमुख मागणीसाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खारपाणपट्ट्यातील पाणी पाजण्यासाठी व अंघोळ घालण्यासाठी टँकरद्वारे संघर्ष यात्रेत पाणी नेण्यात आले. पोलिस हजर असतांना आमदार नितीन देशमुख व त्यांचे १०० ते १२५ कार्यकर्ते परवानगी न घेता खारे पाणी संघर्ष यात्रेसाठी सहभागी झाले होते. २१ एप्रिलला फडणवीस यांच्या नागपुरातील घरावर धडक देण्याचा इशारा देशमुख यांनी दिला होता.
खारपाणपट्ट्याती पाणी प्रश्न अगदी गंभार झाला आहे. लहान बाळालाही हेच पाणी पाजावे लागते आहे. ३ महिन्याच्या बाळाला हे पाणी इथल्या महिला पाजतात, तेव्हा त्यांना काय वेदना होत असतील, असा भावनिक प्रश्न आमदार देशमुख यांनी विचारला आहे. महिला आणि येथील नागरिकांचा हाच प्रश्न घेऊन नितीन देशमुख यांनी या गावांतील पाणी एका टँकरमध्ये जमा करून फडणवीसांच्या निवासस्थानी निघाले आहेत. अकोला, अमरावतीच्या या पट्ट्यातील 3 महिन्यांचं बाळ जे पाणी पितं, तेच पाणी देवेंद्र फडणवीस यांना आम्ही प्यायला देणार आहोत. तेच पाणी अंघोळीसाठी देणार आहोत, तेव्हा त्यांना आमची समस्या लक्षात येईल, अशी भूमिका नितीन देशमुख यांनी मांडली आहे. मात्र या पदयात्रेची परवानगी न घेतल्याने आमदार नितीन देशमुख अडचणीत सापडले आहेत.

ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110