नागपूर. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi ) दुसरी वज्रमुठ सभा (Vajramuth Sabha) नागपुरच्या दर्शन कॉलनी येथी मैदानावर होते आहे. सभा स्थळावरून वाद सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी सभेबाबत मोठे विधान केले आहे. मविआच्या सभेला आमचा विरोध नाही. वज्रमुठ घ्या नाही तर अणखी कोणती मुठ घ्या. पण, त्यांनी व्यक्तिगत टीका केली तर ती चालणार नाही. या सभेत तसे काही ते बोलले, आमच्या नेत्याचा अपमान केला तर तो अपमान मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही सहन करणार नाही. एकदा आम्ही हा अपमान सहन केला आहे. पण, आता तुम्ही देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल काही बोललात, आमच्या शीर्ष नेतृत्वातील कोणत्याही नेत्याबद्दल तुम्ही काही बोललात तर आम्ही ते मान्य करणार नाही, ते सहन करणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आघाडीच्या सभेला आमचा बिलकूल विरोध नाही. त्यांनी जरुर सभा घ्यावी. विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर, पक्षीय धोरणावर बोलावे, त्याला कसलीही मनाई नाही. विरोधकांनी विकासावर आधारित काही मुद्दे मांडले तर सरकारला सुधारणा करता येतात. चार गोष्टींमध्ये बदल करता येतो. पण, आमच्या नेत्यांबाबातचे अनुद्गार यापुढे खपवून घेणार नाही.
महाविकास आघाडीकडून राज्यभरात वज्रमुठ सभा घेतल्या जाणार आहेत. पहिली सभा छत्रपती (SAMBHAJI NAGAR)संभाजीनगरात पार पडल्यानंतर दुसरी सभा नागपुरात होते आहे. या सभेत अडथळ्यांची मालिका कायम आहे. सभेच्या ठिकाणाला स्थानिक भाजप आमदाराकडून विरोध सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी दर्शन कॉलनीच्या मैदानावर सभा घेतली जाऊ नये यामागणीसह न्यायालयात धाव घेतली आहे. मविआ नेत्यांकडून मात्र याच मैदानावर सभेची तयारी सुरू आहे. यापूर्वीच्या सभेला झालेली गर्दी लक्षात घेऊन भाजप पुरती घाबरली आहे. त्यामुळेच हा विरोध असल्याची टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदा विनायक राऊत यांनी संभाजीनगरच्या सभेपेक्षा दुप्पट गर्दी नागपूरच्या सभेत होणार असल्याचे म्हणटले आहे.