धक्कादायक : 5 वर्षीय मुलीचा मृतदेह मिळाला पाण्याच्या टाकीत

0

बेलतरोडी ठाण्याच्या हद्दीतील बेसा परिसरात एका 5 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह घराजवळील पाण्याच्या टाकीत सापडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आह. जन्मतः मुकी (अबोल) असलेली ज्योती शाहू नावाची ही मुलगी काल दुपारी 3 वाजता पासून तिच्या घरासमोरून बेपत्ता झाली, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. या मुलीला शोधण्यासाठी काल पोलिसांनी अथक प्रयत्न  केले ,मात्र मुलगी मिळून आली नाही आज पहाटे मुलीचे वडील राजू शाहू घराजवळून 200 मीटर अंतर असलेल्या पडीत जागेतील प्लॉटच्या मधोमध तयार असलेल्या टाक्यात जाऊन लाकडी दांड्याच्या सहाय्याने मुलीचा शोध घेत असतांना त्यांना मुलगी दिसून आली राजू शाहू यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलोसांना दिली.

विशेष म्हणजे याच दूषित पाण्याच्या टाक्यात काल पोलिसांसह लोकांनी ज्योतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेव्हा ती या टाक्यात सापडली नाही .  मग आज सकाळी याच टाक्यात ती मृतावस्थेत तीच्या वडिलांनी पहिला  त्यामुळे नक्कीच ज्योतीचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की यामागे अजून दुसरं कुठलं कारण आहे हे रहस्य पास्टमार्टम रोपीर्ट येताच पुढे येईल.  ज्योतीचे  आई वडील मूळचे छत्तीसगढचे राहणारे असून कामाच्या शोधात ते नागपूरला आले होते त्यांना 4 मुली असून ज्योती सर्वात लहान होती आणि ती जन्मापासूनच बोलू शकत नाही, बेलतरोडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत