नागपूर : श्री साई मंदीर नरखेडच्या प्रांगणात शाखा नरखेडच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ रविंद्र शोभणे तर उदघाटक म्हणून माजी सभापती,नरखेड पंस नरेशजी अरसडे होते.प्रमोदजी बांदरे , सतीशजी रेवतकर, प्रा सावरकर सर यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. ४२ ज्येष्ठ शिक्षकांचा अमृत महोत्सवी सत्कार नरखेड शाखेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशोकराव दगडे राज्याध्यक्ष मध्यवर्ती कर्मचारी संघटना तथा जिल्हाध्यक्ष से.नि शिक्षक महासभा साहेबराव ठाकरे जिल्हा संपर्क प्रमुख दीपक सावळकर,जिल्हा सरचिटणीस श्रीमती सरीता किंमतकर, कार्याध्यक्ष विनोद राऊत, राज्य प्रतिनिधी शेषराव घुगल, जि कोषाध्यक्ष दीपक तिडके, संजय भेंडे, श्रीमती सुनीता दामले, श्रीमती जयश्री कावळे,शाखा सचिव सूर्यकात वंजारी,शेषराव खंडार, रमेश कापसे, लिखार, श्रीमती सुशिला बावस्कर, श्रीमती मालती आगरकर, मधूकर फरतोडे, यशवंत चिमुरकर, देवराव मानकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित. प्रास्ताविक साहेबराव ठाकरे,संचालन मांगुळकर सर व आभार जीवन डफरे सरचिटणीस नरखेड यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन नरेंद्र गोळे उपाध्यक्ष नरखेड शाखा व जीवन डफरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता साहेबराव काळबांडे व नरखेड शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
श्री साई मंदिर नरखेडतर्फे 42 सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा