अमरावतीहून अमजेरकडे विशेष ट्रेन रवाना

0

खासदार नवनीत राणांच्या मागणीला यश
अमरावती. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa ) पठणावरून राणा दाम्पत्याने थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह सरकारलाच आव्हान देत वाद ओढवून घेतला होता. त्याच खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana ) यांनी अमरावतीहून असमेरसाठी (Amravati to Asmer ) रेल्वेगाडी चालविण्याची मागणी केली होती. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav ) यांना याबाबत पत्र लिहिले होते. रेल्वे मंत्रालयाने त्यांची मागणी मान्य केली आहे. त्यानुसार अजमेर शरीफ येथे होणाऱ्या ख्वाजा मोहिनोद्दीन चुस्ती (ख्वाजा गरीब नवाज) यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन पाठवण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवरुन ही रेल्वेगाडी अजमेरकडे रवाना झाली. शुक्रवारी २७ जानेवारीला सकाळी ही गाडी अजमेरपासून ५ किमी दूरवर असलेल्या दौजाई स्टेशनवर पोहोचली. यामुळे ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्शनासाठी जाऊ इच्छीणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण मुद्द्यावरुन शिवसेनेविरुद्ध आंदोलन पुकारले होते. मुंबईती मातोश्रीसमोर आपण हनुमान चालिसा पठण करणार असा हट्टच त्यांनी धरला होता. त्यावेळी, झालेल्या आंदोलनानंतर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, शिवसेना विरुद्ध राणा असा वाद महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर, महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आता, खासदार राणा यांनी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. ख्वाजा गरीब नवाज यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांना आरामादायी प्रवास घडावा, या हेतुने खासदार राणा यांनी ही मागणी केली होती. त्यास, रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली असून आज ही गाडी रवाना झाली आहे. दरम्यान, अजमेरहून परत येण्यासाठी २९ जानेवारी रोजी रात्री ७ वाजता दौजाई रेल्वे स्टेशनवरुन गाडी सुटणार आहे. ही गाडी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६.१० वाजता अमरावती मॉडेल स्टेशनवर पोहोचणार आहे.
शिवसेनेचा जबर टोला
दरम्यान, खासदार राणा यांच्या या मागणीपत्रावरुन शिवसेना खासदार मनिषा कायंदे यांनी ट्विटरवरुन राणा यांच्यावर निशाणा साधला. आहे. राणा यांच्या मागणीचे पत्र सोशल मीडियावर शेअर करत, जय हनुमान ज्ञान गुण सागर… जय कपीस तिहु लोक उजागर….. असे म्हणत उपरोधिक टोला राणा यांना लगावला आहे.

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |