दैव बलवत्तर म्हणून बचावला : लाखांदूर येथील घटना
लाखांदूर. दुचाकीने घराकडे परतणाऱ्या एका १६ वर्षीय तरुणाचा गळा नायलॉन मांजा चिरला (young man’s throat was cut by nylon manja) गेला. दैव बलवत्तार म्हणून त्याला उपचार मिळाले आणि त्याचा जीव थोडक्यात वाचला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर (Lakhandur in Bhandara district ) येथे ऐन प्रजासत्ताक दिली २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. रुद्रा तुळशीदास तोंडरे (१६) रा. लाखांदूर असे जखमीचे नाव आहे. सायंकाळी रूद्रा आपल्या वडिलांसोबत दुचाकीने घरी गेला. घरी वडिलांना पाणीपुरी खायला जातो असे सांगून चौकात आला. चौकातून दुचाकीने घराकडे परत जात असताना तुटलेल्या पतंगीचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्यावर आला. गळ्यावर काहीतरी असल्याचे जाणवतात रुद्राने आपली दुचाकी थांबविली मात्र नायलॉन मांजा पकडलेल्या अन्य एकाने तुटलेली पतंग मिळण्यासाठी नायलॉन मांजा ओढला. यात रुद्राच्या गळ्यावर गंभीर जखम झाली.
या घटनेत रुद्राचा गळा जवळपास ७ सेंटीमीटर कापला गेला. ही घटना वनविभागाचे कर्मचारी एस जी खंडागळे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ रुद्राला उपचारासाठी लाखांदूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. रुद्रावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मकरसंक्रांत संपून जवळपास आठवडा लोटला असताना देखील पतंगबाजी मात्र सुरूच आहे. स्थानिक दुकानांमध्ये अजुनही प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री जोमात सुरू आहे. नायलॉनमंजाने आनेकांना अपाय झाला आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी पालकांसह नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, संक्रात आटोपून पंधरवाडा लोटला जात असतानाही विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी पतंगबाजी सुरूच आहे. प्रजासत्ताक दिनी सुटी असल्याने अनेकांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला. प्रशासनाने प्रतिबंध घालूनही यंदा नायलॉन मांजाची सर्रास विक्री झाली. नायलॉन मांजामुळे अनेकजण जखमीही झाले. माणसे जखमी होताच त्याची माहिती पुढे येते. मात्र, मोठ्या प्रमाणावर पक्षीसुद्धा जखमी होत आहे. अनेक पक्ष्यांचा मृत्यूसुद्धा झाला आहे.