वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोरील आवारी ट्युटोरियल्स येथे गणराज्यदिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव आवारी होते. प्रमुख अतिथी म्हणून सपना टायपिंगचे दत्ता सप्रे उपस्थित होते. यावेळी गुलाबराव आवारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गणराज्यदिनाचे औचित्य आणि महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रा. घनश्याम आवारी यांनी केले. वैष्णवी येरणे हिने संचालन केले. भूमिका प्रा. परेश हस्ते यांनी मांडली. प्रा. मनोज निब्रड यांनी मानले. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनीर चिंगारी आणि ब्रेड पकोडा Ep.no 77 | Paneer Chingari & Bread Pakoda | Shankhnaad khadyayatra