एसटीची ट्रकला धडक, ३२ प्रवासी जखमी अमरावती मार्गावर अपघात

0

अमरावती. भरधाव एसटी बसने ट्रकला मागून धडक (ST bus hit the truck from behind) दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. पण, एसटीतील 32 प्रवासी जखमी झाले (32 passengers of ST were injured) आहेत. नागपूर- अमारावती महामार्गावर (Nagpur-Amaravati highway) अमरावती शहरातील नांदगाव पेठ पोलीसस्टेशन हद्दीतील पिंपळविहिर ते सावर्डी येथे मंगळवार सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थल गाठून जखमींना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन येथे हलविले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागपुर ते आकोट दरम्यान धावणाऱ्या एमएच ४०- एक्यू ६४३३ क्रमांकाच्या एसटीने पिपंळीविहीर ते सावर्डी या मार्गावर समोर असलेल्या एमएच २०- बीटी ७२८८ क्रमांकाच्या ट्रकला मागून धडक दिली. यावेळी एसटीमध्ये ३५ ते ४० प्रवासी हे प्रवास करीत होते. बहुतांश प्रवासी हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली होती.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बस नेहमीच्याच वेगाने धावत होती. कुणी झोपेत होते, तर कुणी आपसात बोलण्यात व्यस्त होते. अचानक समोर आलेल्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली. ट्रस समोर दिसताच समोरच्या सिटवरील काही प्रवाशी जोरात किंचाळले. चालकाला प्रयत्न करूनही बसवर नियंत्रण मिळविता आले नाही. घटनेनंतर रस्त्यावरून जाणारे मदतीसाठी धावले. घटनेची माहिती परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. जवळच्या वस्तीतील नागरिकाही मोठ्या संख्येने पोहोचले. यामुळे मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी पुढाकार घेत जखमींना एकएककरीत बाहेर काढले. कुणाला गंभीर दुखापत झाली नसल्याची खातरजमा करून घेण्यात आली. तोवर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून जखमींना रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३२ प्रवासी उपचारासाठी दाखल झाले असून, हे सर्व प्रवासी किरकोळ जखमी आहेत.

खासदार नवनीत राणांकडून विचारपूस

घटनेची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्या. त्यांनी आस्थेने जखमींची विचारपूस केली. प्रामुख्यांने लहान मुले व महिला प्रवाशांसोबत चर्चा करीत त्यांना काय हवे, नको याबाबतही विचारणा केली. सर्व सुरक्षित असल्याचे समाधान यावेळी राणा यांनी व्यक्त केले. सोबतच, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्यांनी काही सूचना केल्या.