वीज दर वाढ विरोधात राज्यव्यापी आंदोलन

0

 

महवितरण ची प्रस्तावित ३७% दरवाढ रद्द करा : डॉ देवेंद्र वानखडे

वीज दरवाढी विरोधात आपचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

वीज कंपनीतील भ्रष्ट्राचार थांबवा – जगजीत सिंग

महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात आज आम आदमी पार्टीने नागपूर येथे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात संविधान चौक पासून गड्डीगोदाम महावितरण कार्यालय पर्यंत मोर्चा काढून कार्यकारी अभियंता श्री राजेश घाटोळे यांना निवेदन दिले. आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आज राज्यभर या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले. गड्डीगोदाम महावितरण कार्यालय समोर आप कार्यकर्त्यांनी शिंदे सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार नारे लावले. तसेच महवितरण ची प्रस्तावित दरवाढच्या विरोधात निर्देशन केले.

शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागच्या दोन वर्षात मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलने केली आहेत. दुसरीकडे दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील श्री भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. या वेळेस बोलताना ‘जे इतर राज्यात जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही?’ असा सवाल आप चे ..देवेंद्र वानखडे यांनी केला.

आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आता भाजप – शिवसेना सरकार आले आहे. त्यामुळे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी या युती सरकारवर आहे. त्यामुळे राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. व मुख्यमंत्री शिंदे हे खरे शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी. अशी खोचक टीका आप चे जगजीत सिंग यांनी केली आहे.

याच बरोबर मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात ‘ वीज कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्यामुळे विजेचे दर जास्ती आहेत, वीज दर कमी राहण्यासाठी वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे, कच्चा माल म्हणजे आयात कोळसा खरेदीमधील कृत्रिम भाववाढ , देशांतर्गत कोळसा खरेदीतील भ्रष्टाचार, संशयास्पद कोळसा धुणे प्रक्रिया आदि बाबींमुळे निर्मिती खर्च फुगत असेल तर त्याची सखोल चौकशी करावी. राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी. अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

आजच्या आंदोलनात नागपूर अध्यक्षा कविता सिंघल, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, संघटन मंत्री शंकर इंगोले, अजय धर्मे, विनोद अलमडोहकर, सुरेश खर्चे, संतोष वैद्य, सचिन लोणकर, हेमंत भुजाडे, सुधीर कडू, दिलीप चोखानंदरे, संजय पाटील, प्रतीक चोंडकाळे, श्याम बोकडे, गौतम कावळे, निषाद गोंदे, कपिल भावरे, राकेश लोंढे, राजेश लोंढे, बादल डोंगरे, नमित सावरकर, विकी पेटकर, गिरीश तितरमारे, सोनू फटींग, मोहन मांगर, हेमंत पांडे, बबलू मोहाडीकर,प्रकाश जावडे, तेजराम शाहू, जॉय बांगडकर, अलका पोपटकर, आकाश वैद्य, प्रज्ञाजित सोमकुवर, संदीप कोवे, अनिल भुरेवारश्री रोशन डोंगरे, डॉ .अमेय इ नारनवरे , श्री प्रदीप पौनिकर , श्री नरेश महाजन श्री स्वप्नील सोमकुंवर , नीलम नारनवरे, विजय नंदनवार, मोरेश्वर मौंदेकर, माणशिंग अहिरवार,रवींद्र गिधोंडे,किशन निमजे ,विशाल वैद्य, पंकज मेश्राम , शुभम मोरे , डॉ परिश भौतकर ,क्लेमेंट डेविड . मयंक डोंगरे , राजेन्द्र चौहान, प्रकाश चौहान, दिनेश टेकाम, शशांक बोरकर, सुहेल गणविर, रविकान्त चौरसिया,सचिन पारधी, सुषमा कांबळे, निखिल मेंढवाडे,राजेश तिवारी, प्रशांत अहिरराव, शुभम पराळे,स्मिता घोरपडे, संजय जीवतोडे,कल्पना ताई भावसार, उमाकांत बनसोड हरीश वेळेकर, विजय धकाते, मंजुश्री पोटभरे, फईम अन्सारी, प्रभात अग्रवाल, संगीता बाथो, सागर जैस्वाल, पिंकी बारापात्रे, चेतन निखारे, पियुष आकरे, क्रुतल आकरे, लक्ष्मीकांत दांडेकर, जहागीर पठाण, राजू शेळके, रमेश बावणे, दिपक भातखोरे व्यतिरिक्त अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा