नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणार, पोलिस आयुक्तांचा इशारा

0
नागपूर
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाने सोमवारी (ता.९ जानेवारी) ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोधपथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीसंदर्भात एका प्रतिष्ठानावर कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत एक किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच नायलॉन मांजाच्या विरोधात ९८ आस्थापनेची तपासणी करण्यात आली. धंतोली झोन अंतर्गत इंदिरानगर येथील पतंग दुकानातून २0 प्लास्टिक पतंगे जप्त करून १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत टिमकी, मोमीनपुरा येथील गणपती सोनपापडी यांच्याविरुद्ध कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग नंबर १३, अभ्यंकरनगर येथील ग्रीन सेरेनिटी यांच्याविरुद्ध रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून १0 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.