मुंबईत आझाद मैदानावर व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद

0

(Mumbai)मुंबई : आझाद मैदानावर व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. आंदोलनानंतर संपूर्ण राज्याच्या वतीने (Sandeep Kale, Founder and National President of Voice of Media)व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, (National Office Secretary Divya Bhosale)राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालय यांचे सचिव यांना मागणीचे निवेदन दिले. त्याचबरोबर राज्यातील सर्व मध्यमांचे काम ज्या माहिती व महासंचनालयाच्या माध्यमातून चालते त्या (Hemraj Bagul, Director General of Information in charge of the department)विभागातील प्रभारी माहिती महासंचालक हेमराज बागुल,(Rahul Tidake)राहुल तिडके
संचालक (वृत्त/ जनसंपर्क) व (Dayanand Kambale)दयानंद कांबळे
उपसंचालक (वृत्त) यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. मागणी संदर्भात तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी सर्व मान्यवरांनी दिले.राज्यात आज विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी कार्यालय,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार कार्यालय, अशा 353 ठिकाणी धरणे आंदोलनात अडीच हजारापेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.