(Nagpur )नागपूर : जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 53 (Gram Panchayat by-elections)ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका येत्या 18 मे रोजी होणार आहेत तर मतमोजणी 19 मे ला होणार आहे. पोट निवडणूक कालावधीत म्हणजेच 17 मे, 18 मे व 19 मे या तीनही दिवशी या ग्रामपंचायती क्षेत्रात दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश (Collector Dr. Vipin Itankar) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जारी केले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील
तालुकानिहाय पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत या प्रमाणे आहेत. काटोल-6, नरखेड-7, सावनेर-3, कळमेश्वर-4, रामटेक-3, पारशिवणी-2, मौदा-4, रामटेक-3, कामठी-2, उमेरड-2, भिवापूर-9, कुही-6, नागपूर ग्रामीण- 2, हिंगणा-3 अशा 53 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूक होणार आहेत.