Home Artical Blog आकाश निरीक्षणातून विद्यार्थ्यांनी अनुभवला खगोलविश्वाचा रोमांच

आकाश निरीक्षणातून विद्यार्थ्यांनी अनुभवला खगोलविश्वाचा रोमांच

0

नागपूर(Nagpur), दि. १२ मे :
प्रोफेसर राजेंद्र सिंग सायन्‍स एक्‍सप्‍लोरेटरीच्या वतीने स्‍वामीनारायण इंटरनॅशनल गुरुकूल येथे आयोजित केलेल्‍या आकाश निरीक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र विश्‍वाची सफर करत रोमांच अनुभवला.
पीआरएसएसईच्‍या संचालक डॉ. सीमा उबाळे यांच्‍या नेतृत्‍वात एकता, राणी, प्रांजली आणि अनुराग यांच्‍यासह विद्यार्थ्‍यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. हिमाचल प्रदेशातील प्रा. हेमंत कुमार यांनी विद्यार्थ्यांना तारे, तारकासमूह, नक्षत्रे आणि ग्रहांची स्थिती याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ज्‍युपिटर ग्रह, त्याचे उपग्रह, चंद्र तसेच अनेक कृत्रिम उपग्रहांचे निरीक्षण केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. जस्मीर रंधावा, डॉ. प्रशांत आंबेकर, डॉ. गोविंद लखोटिया, डॉ. प्रणिता देशपांडे, डॉ. श्रद्धा जोशी आणि साहेबराव पोरडवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच राहुल व आशिष यांचे विशेष सहकार्य लाभले.