शिक्षक महासभा तर्फे सुधाकर अडबाले यांचाशी चर्चा

0

नागपूर विभागाचे शिक्षक आमदार मा सुधाकर अडबाले यांचेशी भेटून म . रा से नि प्रा शिक्षक महासभे च्या प्रतिनिधी मंडळांनी त्यांच्या समस्या विषयी चर्चा केली व येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनान लक्षवेधी लाउन आवाज उठविण्या ची विनंती केली . कारण गेल्या दिड वर्षापासून से नि प्रा शिक्षकांचे उपदान . अंशराशी करण . गटविमा . ७वे वेतन आयोगा चे हप्ते थकीत आहेत . व त्यामुळे सेनि शिक्षकांच्या अडचणी वाढत आहेत . व त्यामुळे काही पिडित शिक्षकांचे हृदय घात व आजारांने निधन होत आहे काहीनी आत्महत्या पण केल्या आहेत . चर्चेतील गंभीर बाबी ऐकुन मा आमदारांनी पण लगेच लक्षवेधी लावण्याचे मान्य केले व तसे निर्देश त्यांनी त्याचे पी.ए.हितेश सर यांना त्याच वेळ दिले . शिष्टमंडळात जि सरचिटणीस दिपक सावळकर . राज्यप्रतिनिधी विनोद राउत . जि मुख्य संघटक संजय भेंडे व जि संघटन सचीव दिपक तिडके व वि मा शिक्षक महासंघाचे मुरलीधर काळमेघ उपस्थित होते . या भेटी करिता मुरलीधर काळमेघ व शैलेश एडके व जुनी पेन्शन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले

 

महाराष्ट्र शासनाने काढलेल्या सेवानिवृत्तांच्या कंत्राटी नियुक्तीच्या शासनादेशास म.रा.से.नि.उ.श्रे. मुख्या.व प्राथ.शिक्षक महासभा नागपूरच्या विरोधाचे जे निवेदन मा.मुख्यमंत्री,मा.शिक्षणमंत्री,मा.शिक्षण आयुक्त,मा.जिल्हाधिकारी,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मा.तहसिलदार, काटोल यांच्या मार्फत पाठविले.त्या पत्राची प्रत मा.सुधाकर अडबाले शिक्षक आमदार यांना सन्मानाने सूपूर्द करण्यात आली. निवेदन देताना सर्वश्री विनोद राऊत, राज्य प्रतिनिधी,दिपक सावळकर, सरचिटणीस दिपक तिडके, संघटन सचिव, संजय भेंडे, मुख्य संघटक, मुरलीधर काळमेघ, जिल्हा अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हे उपस्थित होते.