नागपूर -माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख यांना प्रदेश भाजपाने मोठी जबाबदारी दिली आहे. ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आणि भाजपा महाराष्ट्राचे सह-मुख्य प्रवक्ता (हिंदी आणि इंग्रजी मिडिया) अशा दोन पदांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे नियुक्ती पत्र प्रदान केले. डॉ. आशिष देशमुख हे एक अभ्यासू आणि धडाडीचे नेते असून ओबीसींच्या प्रगतीसाठी चांगले कार्य करीत आहेत. या दोन्ही जबाबदाऱ्या ते नक्कीच चांगल्याप्रकारे पार पाडतील,असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत भाजपाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.