नागपूर – भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे गुरुवारी एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आगमन झाले. विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. के चंद्रशेखर राव हे भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातील तसेच तेलंगणा राज्याबाहेरील पहिल्या कार्यालयाचे नागपुरात उद्घाटन करणार आहेत. वर्धा मार्गावरील भारत राष्ट्र समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन के चंद्रशेखर राव करणार आहेत. त्यानंतर सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे.