गैरसोयीच्या विरोधात विद्यार्थ्यांचे थाळीनाद आंदोलन

0

 

बुलडाणा- बुलढाण्याच्या खामगाव शहरात समाज कल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील दिली जाणारी फळे त्याचबरोबर अन्न हे अतिशय निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याचा आरोप वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केला आहे. रात्रीला वसतिगृह अधीक्षक सुरक्षारक्षक हे देखील हजर नसल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र, अजूनही त्याची दखल घेतली नसल्याने, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून वसतिगृहासमोर आज थाळीनाद आंदोलन करण्यात आले. याची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.