मुंबई mumbai : अकोल्यात कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारीमुळे कृषीमंत्री Abdul Sattar अब्दुल सत्तार अडचणीत आलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसमोर सत्तार यांची ‘खरडपट्टी’ काढल्याचे सांगितले (Agriculture Minister Abdul Sattar) जाते. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असून यापुढे अशा घटना होऊ नयेत, अशी समज सत्तार यांना देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापलेले होते, असा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे.
अकोल्यात कृषी विभागाकडून बियाणे विक्रेत्यावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. या कारवाईत कारवाईत पथकात काही खाजगी लोकांचा समावेश होता. यात सत्तार यांच्या कथित पीए चा देखील सहभाग असल्याची चर्चा होती. सत्तार यांनी संबंधित व्यक्ती आपला पीए नसल्याचा दावा केला असला तरी काही कागदपत्रांमध्ये त्या व्यक्तीचे नाव सत्तार यांचे पीए म्हणून दर्शविण्यात आले असल्याने विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली आहे.
या सर्व प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना कारभार सुधारण्याचा सल्ला दिला. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांची कानउघडणी केली. तर हा सर्व प्रकार गंभीर विषय असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सत्तार यांनी सारवासारव केली. मात्र, दोन्ही नेते त्यांचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.