
अमरावती (Amravti), 29 जुलै सध्या राज्यात ‘माझी लाडकी बहीण’ पाठोपाठ भावाची योजना सुरू झाली आहे. अशा लाडक्यांकडून योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला आश्वस्त करण्यासाठी शासनाने ‘माझा लाडका शेतकरी दादा’ ही योजना सुरू करावी, अशी मागणी आता ग्रामीण भागातील शेतकरी करीतआहे.
लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजनेत लाभार्थ्यांना महिन्याला दीड हजार मिळणार आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी जर शासनाने ‘माझा लाडका शेतकरी दादा’ही योजना आणून शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चानुसार हमीभाव मिळावा, ही रास्त अपेक्षा या योजनेंतर्गत हवी, अशी मागणी आहे. (Majhi Ladki Bahin Yojana Online Apply) (Maza Ladka Bhau Yojana 2024 )
शेती व्यवसाय हा पूर्णतः निसर्गाच्या भरवशावर आहे. हा अशाश्वत व्यवसाय शेतकऱ्यांचे जीवन डावावर लावतो. अनेक शेतकरी नापिकीमुळे कर्ज भरण्यास असमर्थ राहतात. परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा मोसंबी फळबागांची अवस्था केविलवाणी आहे. येथल्या संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा, ही मागणी आहे. ‘माझा लाडका शेतकरी दादा’ या योजनेत फळपिकांना विम्याचे कवच, योग्य भाव तसेच फळांवर आधारित वायनरी प्रकल्प येथे उभे केले की, संत्रा मोसंबी फळांच्या सर्व प्रतवारीच्या फळांना योग्य भाव मिळेल, हीच रास्त अपेक्षा व मागणी असल्याचे असंख्य संत्रा,मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
लाडका भाऊ योजना website