Home Breaking news महसूल मंत्री यांनी कर्मचारी व अधिकारी यांची विनाचौकशी  निलंबनाची घोषणा केल्याने जिल्ह्यातील ...

महसूल मंत्री यांनी कर्मचारी व अधिकारी यांची विनाचौकशी  निलंबनाची घोषणा केल्याने जिल्ह्यातील तहसीलदार संघटना आक्रमक

0

19 डिसेंबर ला कामबंद आंदोलन करणार,आज जिल्हाधिकारी यांना निवेदन

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना
वर्धा जिल्हा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना

 वर्धा : राज्याचे मा. महसूल मंत्री यांनी विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाची घोषणा केली तसेच महसूल विभागाच्या दिर्घकालीन प्रलंबित असलेल्या आर्थिक व सेवा विषयक विविध मागण्यांचा निपटरा न होणेमुळे महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि भितीच्या वातावरणामुळे दिनांक 19.12.2025 पासून ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन पुकारले आहे.

महाराष्ट राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ यांची कामबंद आंदोलन पत्र दिनांक 16 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. महसूल विभागाद्वारा शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी व जन कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते. सर्वसामान्य जनतेशी संबंधित कामे व समस्यांसदर्भात महसूल विभाग कार्यरत असल्याने जनमानसात विभागाबाबत आदराची व आपुलकीची भावना आहे. तथापी, महसूल मंत्री महोदयांच्या मार्फत विधिमंडळात अधिकारी व कर्मचारी यांच्या विनाचौकशी निलंबनाची कारवाई करण्याची घोषण केल्याने जिल्ह्यातील तहसीलदार संघटना एकत्र येऊन 19 डिसेंबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील तहसीलदार , नायब तहसीलदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी
रविराज घुमे, वर्धा