Home LOCAL NEWS नागपूर महानगरपालिकेच्या सामूहिक यशासाठी सन्मानजनक जागावाटप करण्यावर भर

नागपूर महानगरपालिकेच्या सामूहिक यशासाठी सन्मानजनक जागावाटप करण्यावर भर

0

नागपूर (Nagpur):- नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीमधील एक महत्त्वपूर्ण घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आज समन्वयाची आणि सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने महायुतीतील इतर घटक पक्षांना सोबत घेऊन सन्मानजनक जागावाटप करण्यावर भर दिला आहे, जेणेकरून सामूहिक यश मिळवता येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्ट केले की, नागपूर शहरात पक्षाची वाढलेली ताकद पाहता, महानगरपालिकेच्या एकूण जागांपैकी किमान १५ टक्के जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक लढवण्यास संधी मिळणे आवश्यक आहे. ही मागणी महायुतीमधील सन्मानजनक भागीदारीसाठी करण्यात येत आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे की महापालिका निवडणुकीत पक्षाला १५ टक्के तरी जागा मिळाव्यात. अन्यथा, पूर्ण प्रभागनिहाय उमेदवार लढवण्याची पक्षाची तयारी आहे. तसेच आम्ही घटक पक्षांना सोबत घेऊन देखील निवडणूक लढवण्यास मागेपुढे पाहणार नाही.”

पक्षाचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी महायुतीच्या यशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगदानावर भर दिला.
अलीकडील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पूर्ण आणि निःस्वार्थ सहकार्य केले. आमच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच महायुतीच्या उमेदवारांना भरभरून यश मिळाले. हा समन्वय महापालिका निवडणुकीतही कायम ठेवणे आवश्यक आहे.”
आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षांनी व घटक पक्षांनी एकत्रितपणे (सोबत येऊन) निवडणुका लढवायला हव्यात. महायुतीचा धर्म पाळून सर्व घटक पक्षांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळालाच पाहिजे. सलोख्याने हा प्रश्न सोडवल्यास महायुतीची ताकद प्रचंड वाढेल.”

या संदर्भातील पुढील घडामोडींसाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी, पक्षाचे जिल्हा निरीक्षक श्री. राजेंद्र जैन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. १७ डिसेंबर २०२५) ला पक्ष कार्यालयात एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे.
बैठकीचा उद्देश: या बैठकीत महायुतीमधील समन्वय साधण्याच्या दृष्टीने पक्षाची अंतिम रणनीती आणि प्रभागनिहाय तयारीचा आढावा घेतला जाईल.