
माझे तुम्हाला थेट दोन सवाल, ते सारे एकमेकांशी जुळवून घेतात म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन्स आणि बौद्ध फारसे एकमेकांच्या उरावर बसत नाहीत किंवा एकमेकांचे धर्मांतर घडवून आणण्यात त्यांना फारसा रसही नसतो मग जगातले भारतातले मूठभर हिंदूच या साऱ्यांच्या नजरेला का खुपतात केवळ हिंदूंचे धर्मांतर घडवून आणावे हे त्या साऱ्यांना कायम का वाटत आले आहे तरीही हिंदुत्व का व कसे टिकून आहे ? दुसरा सवाल मला कालपासून अनेकांनी विचारला कारण सरळ होते उघड होते, मी म्हणालो जर 100 वर्षांपूर्वी रा स्व संघाची स्थापना झाली नसती तर आज मोदींचे नाव अब्दुला असते आणि भागवतांचे आडनाव खान राहिले असते आणि माझ्या याच मुद्द्यावर अनेकांनी नाके मुरडली त्यांचे सांगणे असे कि असे असंख्य बहुसंख्य हिंदू जे कधीही संघात गेलेले नाही तरीही त्यांचे हिंदुत्व अबाधित आहे संघ नसता तरीही ते या पद्धतीने अबाधित राहिले असते अर्थात लोकांचा हा युक्तिवाद मला मान्य पण एक नक्की आहे कि संघ जन्माला घातल्या गेला नसता तर जगभरातले भारतातले हिंदू नक्कीच एकवटले नसते आणि संघाच्या जन्माआधी देखील ते केवळ एकवटले नसल्यानेच अनेक हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणण्यात आले मोगलांनी मुसलमानांनी आक्रमण केले आणि ख्रिसचनांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले जे पुढे काँग्रेसने आंदोलने करून पुन्हा नक्कीच ताब्यात घेतले पण त्यानंतर स्वतंत्र हिंदुस्थानचे महत्व आणि हिंदूंचे अस्तित्व अबाधित ठेवले ते संघ भाजपाच्या भूमिकेतून हिंदुत्व एकवटल्याने…
आपल्या देशात अनेक संघटना राजकीय पक्ष आजतागायत आले गेले फार थोडे कसेबसे टिकले अगदी आपल्या राज्यातली बाळासाहेबांची मूळ शिवसेना देखील पार रसातळाला गेली दुर्दैवाने संघ भाजपाव्यतिरिक्त एकही संघटनेला राजकीय पक्षाला हे हिंदुराष्ट्र व्हावे असे अजिबात वाटले नाही किंबहुना देशाची डावी चळवळ असेल पुरोगामी असतील आणि काँग्रेस त्या साऱ्यांना हिंदुराष्ट्राची कल्पना साधी स्वप्नात देखील आली नाही किंबहुना बहुतेकांचा प्रयत्न आणि प्रेम केवळ मुस्लिम धार्जिणे होते. संघाने जगभरात त्यांच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विश्व् हिंदू परिषद पद्धतीच्या ज्या पाच पन्नास शाखा आहेत त्या माध्यमाद्वारे संघाने मोठ्या खुबीने हिंदूंना आधी एकत्र ठेवले त्यानंतर त्यांच्या मनावर हिंदुत्व कोरून हिंदुराष्ट्राची कल्पना आणि महत्व त्यांना विशद केले अगदी धर्मांतर करणाऱ्या हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातल्या एकेकाळच्या अशिक्षित आदिवासींना देखील त्यांनी प्रसंगी जीव धोक्यात घालून हिंदुत्व आधी समजावून सांगितले त्यांना मिशनऱ्यांच्या मोहजाळातून अलगद बाहेर काढून होणारे धर्मांतर संघ स्वयंसेवकांनी प्रचारकांनी मोठ्या कष्टाने रोखले आणि नेमके हेच सत्य आहे कि जरी संघात न जाणारे देखील कट्टर हिंदुत्व पाळतात जी वस्तुस्थिती आहे मात्र संघाशिवाय जे हिंदू आहेत एकतर ते एकत्र नाहीत किंवा प्रमाण अगदीच तुरळक आहे ज्यातून जगभरातल्या भारतातल्या हिंदूंचे संकट दूर करणे धर्मांतर आणि आक्रमण टाळणे अजिबात शक्य होत नाही होणार नाही.
हिंदुराष्ट्राचे स्वप्न संघ भाजपाशिवाय शक्य नाही कारण इतर संघाबाहेरच्या कुठल्याही हिंदू संघटनांनी ते स्वप्न कधीही बघितले नाही अगदी बाळासाहेबांच्या शिवसेनेने देखील अर्थात बाळासाहेब हयात असेपर्यंत, आता तर उद्धवजींच्या कार्यकाळात ती मुस्लिमसेनाच अधिक वाटते. यापुढे भारताची ओळख हिंदुराष्ट्र अशीच व्हावी आणि मुसलमानांचे फाजील लाड थांबविल्या जावे अन्यथा देध्यातले जगातले सारेच मुसलमान हिंदूंच्या वाईटावर टपलेले असतात…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी