Home LOCAL NEWS पहिल्या मुख्यमंत्री महाकरंडकावर ‘नामदेव पायरी’ चा झेंडा

पहिल्या मुख्यमंत्री महाकरंडकावर ‘नामदेव पायरी’ चा झेंडा

0

 ‘चाप्लीन स्माईल’ द्वितीय तर ‘दी डार्क एज’ तृतीय

 ‘प्रेम कि यातना’, ‘राडा’ ठरल्या उत्तेजनार्थ तर ‘नवरा आला वेशीपाशी’ ठरली लक्षवेधी

नागपूर, 28 नोव्हेंबर: आमदार संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून व श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट, मोहगाव (झिल्पी) च्या वतीने २३ नोव्हेंबरपासून सायंटिफिक सभागृहात सुरु असलेल्या राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एकांकिकांच्या पहिल्या मुख्यमंत्री महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा समारोप गुरुवारी झाला. रात्री उशिरा झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात माणुसकी मल्टीपर्पज फाऊण्डेशन, बुलडाणातर्फे सादर झालेल्या ‘नामदेव पायरी’ या एकांकिकेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिराफ थियेटर्स, टीटवाळा, मुंबईच्या ‘चाप्लीन स्माईल’ या एकांकिकेला द्वितीय तर चंद्ररथ थियेटर्स, नागपूरच्या ‘दी डार्क एज’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत वैभव दीपनाट्य संस्था, सोलापूरतर्फे सादर ‘प्रेम कि यातना’ व अ. भा. मराठी नाट्य परिषद, मुंबईतर्फे सादर ‘राडा’ या एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिक तर स्वामी नाट्यांगण, डोंबिवली, मुंबईतर्फे सादर ‘नवरा आला वेशीपाशी’ ही एकांकिका लक्षवेधी ठरली.
बक्षीस वितरण सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार (संपादक) श्रीपाद अपराजित, प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर व आयोजन समितीचे नरेश गडेकर, परीक्षक अशोक समेळ, शकुंतला नरे आणि डॉ. सतीश पावडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्याना पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्पर्धेला आमदार संदीप जोशी, देवयानी जोशी यांची देखील उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल माटेगांवकर व वैदेही चवरे-सोईतकर यांनी केले. तत्पूर्वी झालेल्या नाट्यविषयक चर्चासत्रात ज्येष्ठ रंगकर्मी रमेश लखमापुरे, शेफ विष्णू मनोहर, अभिनेता नरेश गडेकर, निर्माती आसावरी तिडके-गडेकर व लेखक प्रवीण खापरे यांनी सहभाग नोंदवला.
————-
वैयक्तिक पुरस्कार

दिग्दर्शन
प्रथम – विजय सोनोने (नामदेव पायरी)
द्वितीय – बॉबी (चाप्लीन स्माईल)
तृतीय – यशवंत चोपडे (दी डार्क एज)
उत्तेजनार्थ (प्रथम) – दीपक शिंदे (प्रेम कि यातना)
उत्तेजनार्थ (द्वितीय) – षण्मुखानंद आवटे (राडा)
———-
लेखन
प्रथम – रवींद्र इंगळे चावरेकर (नामदेव पायरी)
द्वितीय – राकेश जाधव (चाप्लीन स्माईल)
तृतीय – चंद्रकांत चौधरी (दी डार्क एज)
उत्तेजनार्थ (प्रथम) – दीपक शिंदे (प्रेम की यातना)
उत्तेजनार्थ (द्वितीय) – षण्मुखानंद आवटे (राडा)
—————
रंगभूषा आणि वेशभूषा
प्रथम – असिधारा लांजेवार (दिव्यदान)
द्वितीय – स्वाती तराळ/ज्योती करनुके (चित्रांगदा)
तृतीय – जुईली म्हस्के/ऐश्वर्या बटनाल (चाप्लीन स्माईल)
उत्तेजनार्थ (प्रथम) – पांडुरंग शिनगारे/ अश्विनी देहाडे
उत्तेजनार्थ (द्वितीय) – ललित पिंपळघरे/ मयूर पंडित
———–
प्रकाश योजना
प्रथम – लक्ष्मीकांत गोंदकर (नामदेव पायरी)
द्वितीय – सी शिरसेकर (चाप्लीन स्माईल)
तृतीय – अक्षय खोब्रागडे (दी डार्क एज)
उत्तेजनार्थ (प्रथम) – दीपक शिंदे (प्रेम की यातना)
उत्तेजनार्थ (द्वितीय) – राजेश शिंदे (राडा)
———-
नेपथ्य
प्रथम – योगेश मेहर (लेखिका)
द्वितीय – अभिषेक अर्वाने (गटार)
तृतीय – देवयानी चोपडे/ धर्मेंद्र चोपडे (दी डार्क एज)
उत्तेजनार्थ (प्रथम) – पराग काकचुरे (नामदेव पायरी)
उत्तेजनार्थ (द्वितीय) – संकेत पगारे/ प्रथमेश बायदुरकर (कॅनॉल)
———
संगीत
प्रथम – विजय सोनोने (नामदेव पायरी)
द्वितीय – अक्षता टाले (चाप्लीन स्माईल)
तृतीय – शैल चौधरी (दिव्यदान)
उत्तेजनार्थ (प्रथम) – योगेश कदम (पेंदुलम)
उत्तेजनार्थ (द्वितीय) – अजिंक्य थेर (लेखिका)
——-
अभिनय
प्रथम – प्रसाद दामले (नामदेव पायरी), शीतल रोडकर (चाप्लीन स्माईल)
द्वितीय – संदीप रोडकर (चाप्लीन स्माईल), रंजना मोरे (नवरा आला वेशीपाशी)
तृतीय – यशवंत चोपडे (दी डार्क एज), भावना चौधरी (दी डार्क एज)
उत्तेजनार्थ (प्रथम) – जैद शेख (प्रेम कि यातना), राखी गोरखा (पिसाळा)
उत्तेजनार्थ (द्वितीय) – गणेश देशमुख (नामदेव पायरी), रोशनी सेलोकर (लेखिका)
———
विशेष पारितोषिक
विनोदी अभिनय – प्रथमेश देवकुळे (नवरा आला वेशीपाशी), मानसी पाठक (पेंदुलम)
लक्षवेधी अभिनय – ऋषिकेश कारके (बुजगावणं), स्नेह तराळ (चित्रांगदा)
महिला दिग्दर्शक – आकांक्षा धंदर (अर्बन)
बाल कलावंत – साकेत रोडकर (चाप्लीन स्माईल)
प्रथम पुरस्कार
द्वितीय पुरस्कार
तृतीय पुरस्कार