आयुष्याचा राजमार्ग म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष

0

अथर्वशीर्ष अक्षय आनंदाचा राजमार्ग -प्रा.स्वानंद पुंड

 

नागपूर(Nagpur)-श्री गणेश अथर्वशीर्षाच्या माधमातून भगवान श्री गणेशांच्या चरणी पोहोचत अखंड आनंदाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. ही जीवनात कोणत्याही परिस्थितीत मनस्थितीला शांत ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. सुखी, समाधानी, प्रसन्न, आनंदी आयुष्याचा राजमार्ग म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष. या दिव्य स्तोत्राचा अर्थ समजून घेऊन त्यानूसार आपली जीवनयात्रा सुनिश्चित केली तर खऱ्या अर्थाने आपली चतुर्थी साजरी होईल असे विचार सुप्रसिध्द गाणपत्य तत्वज्ञान अभ्यासक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी व्यक्त केले.
नागपूर नगरीचे ग्रामदैवत श्री टेकडी गणपती देवस्थानच्या वतीने नुकत्याच झालेल्या श्री गणेश अथर्वशीर्ष निरूपण मालिकेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
आजपर्यत हजारो वेळा हे स्त्रोत म्हटले पण त्याचा नेमका अर्थ काय आहे तो आता कळला ही अनेक श्रोत्यांची प्रतिक्रिया निरूपण मालिकेची खरी उपलब्धी ठरली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष विकास लिमये तथा सचिव श्रीराम कुलकर्णी यांच्या हस्ते पुंड यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कोषाध्यक्ष दिलीप शहाकार सहसचिव अरूण व्यास हे विशेषत्वाने उपस्थित होते.
आभार प्रदर्शन विश्वस्त अरूण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कमलेश वसानी आणि जयेश वसानी या बंधूंनी या संपूर्ण निरूपण मालिकेचे निःशुल्क चित्रीकरण केले तथा सुनील माधोळकर यांनी ध्ननिक्षेपण व्यवस्था सांभाळली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा