विद्यावाचस्पती,डॉ.स्वानंद पुंड यांना दिले चित्र भेट

0

नागपूर(Nagpur)-श्री गणेश अथर्वशीर्ष जीवनात कोणत्याही परिस्थितीत आपली मनस्थिती शांत ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. सुखी, समाधानी, प्रसन्न, आनंदी आयुष्याचा राजमार्ग म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष, अथर्व व्हा,शीर्षस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करा, मोरयाचे चिंतन करा असे प्रतिपादन प्रसिध्द गाणपत्य तत्वज्ञान अभ्यासक, विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी केले. श्री टेकडी गणेश देवस्थानच्या वतीने नुकतेच श्री गणेश अथर्वशीर्ष निरूपण मालिकेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. डॉ. पुंड यांनी सोप्या भाषेत मोरयाची महती व्यावहारिक उदाहरणांसह स्पष्ट करून सांगितली जी या निरूपण मालिकेची खरी उपलब्धी ठरली. यानिमित्ताने युवा चित्रकार मंदार व अर्णव राजेंद्र उट्टलवार यांनी प्रा स्वानंद पुंड यांचे पेन्सिल स्केच चित्र भेट दिले. प्रा पुंड यांनी त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांसह देवस्थानचे अध्यक्ष विकास लिमये, सचिव श्रीराम कुलकर्णी,कोषाध्यक्ष दिलीप शहाकार, सहसचिव अरूण व्यास,अरूण कुलकर्णी उपस्थित होते.