बुलढाणा : लग्नातील डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजविण्यावरुन काही जणांमध्ये वादावादी झाली. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. काही ठिकाणी दगडफेक सुद्धा करण्यात आली, दोन समाजातील गट परस्परांविरोधात भिडल्याने जातीय तेढ निर्माण झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत सैलानी नगर भागात घडली आहे. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला.जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून आरोपींची धरपकड सुरू असून, शहरात तणाव पूर्व शांतता आहे. काही भागात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आले असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली असून असे घडले असेल तर संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे.